
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर बाल सुसंस्कार शिबिरामध्ये शिकविलेल्या वेगवेगळ्या कला आणि साहसीक प्रात्यक्षिक सादर करीत बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप झाला. यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, मार्गदर्शक म्हणून पद्माकर ठाकरे, जिल्हा सेवाधिकारी, रुपेश रेघे जिल्हा युवा प्रमुख तसेच शिबीर प्रमुख ह. भ. प. डाखरे महाराज, शिबीर शिक्षक नंदू मालवे,मारोती ठेंगणे,जिल्हा प्रचारप्रमुख,ज्ञानेश्वर कडुकर, उप ता. सेवाधिकारी ,अशोक भेंडाळे, जिल्हा सदस्य,गजभिये, सुनील देऊळकर, सुमित गेडाम उपस्थित होते.
दि.25 मे पासून मारेगाव येथील पुरके आश्रम शाळेमध्ये बाल सुसंस्कार शिबिराला सुरुवात झाली होती. 12 दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये बालकांना ध्यान,प्राणायाम, योगासणे, लाठी काठी, कराटे, भजन, कीर्तन,सामुदायिक प्रार्थना, सामाजिक भान,कुटुंबामध्ये राहतांना आईवडिलांशी कसे वागावे याचे धडे तसेच बौद्धिक चिंतन, ग्रामगीता अभ्यास सुद्धा करून घेण्यात आला.बालकांना देण्यात आले. तसेच समारोपीय प्रसंगी ही सर्व प्रत्यक्षिके उपस्थितांसमोर,पालकांसमोर सादर केल्या गेली. यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच केवळ 10 दिवसामध्ये बाल सुसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गुण आत्मसात केले त्याबद्दल सर्व मान्यवर तसेच पालकांनी ह. भ. प. डाखरे महाराज यांचे आभार मानले. यावेळी पांढरकवडा येथील भेंडाळे यांचेकडून बेलाच्या वृक्षाचे दान देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन नंदू मालवे यांनी, प्रास्ताविक राजू सिडाम यांनी तर आभार किसन मत्ते यांनी मानले. संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी मारेगाव तालुक्यातील सर्व गुरुदेव उपासकांनी सहकार्य केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






