मोबाईल संस्कृतीतून बाहेर पडून मैदानांची कास धरा-आ.सौ. सुलभाताई खोडके

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विभागीय क्रीडा संकुल येथे खुली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात

अमरावती :  आजच्या तरुणाई मध्ये मोबाईलचा उपयोग अधिक प्रमाणात वाढल्याने याचा विपरीत परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर दिसून येत आहे. मोबाईल ने संवाद कमी केला असून मैदानी खेळाकडे सुद्धा मुलांचा कल कमी होतांना दिसत आहे. खेळाडू वृत्ती जोपासून विजेता बनण्यासाठी क्रीडा -कौशल्य जोपासणे महत्वाचे आहे. त्यामुळे मोबाईल संस्कृतीतून बाहेर पडून मैदानांची कास धरा, असे प्रतिपादन अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले .
विभागीय क्रीडा संकुल येथील रोल स्केटिंग रिंग येथे १ व २ जुन रोजी आयोजित दोन दिवसीय खुली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्ह्णून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके,स्पर्धेचे प्रयोजक बिर्ला ओपन माईन्ड इंटर नॅशनल स्कुलचे संस्थापक सुधीर वाकोडे ,हस्ट्री जोशी सर , एस.पी कोचिंग क्लासेसचे संस्थापक प्रवीण कावळकर, प्रशिक्षक श्याम भोकरे आदीसह मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण शारीरिक व मानसिक अभिक्षमतांचा विकास साधणारी रोलर स्केटिंग स्पर्धा ही साधे स्केट्स, क्वाडस स्केट्स व ईनलाईन स्केट्स या तीन प्रकारात घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये तब्बल ४६६ स्पर्धकांनी सहभाग दर्शवीत रोलर स्केटिंग चे उत्कृष्ट क्रीडा-कर्तब व प्रात्यक्षिक सादर केले. दरम्यान आमदार महोदयांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून प्रथम आलेल्या. कु. कृष्णा पंजवाणी, द्वितीय अराहन खान अफरोश, जोहान अली रिजवी यांना रोलर स्केटिंगचीं किट भेट देण्यात बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात दि अमरावती डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप खत्री, उपाध्यक्ष रत्नाकर सिरसाट, सचिव श्याम भोकरे, प्रा. नीलकंठराव चौधरी, स्वप्नील भोकरे, किशोर बोरकर, सौ भारती हंबर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013600
error: Content is protected !!