
अमरावती : एका सराईत दुचाकी चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ जून रोजी बन्हाणपूर येथून अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्यात. मिलिंद संतोष वानखडे (३०, रा. बहऱ्हाणपूर, चांदूरबाजार) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे.
मिलिंद हा चोरीची दुचाकी बाळगून असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने मिलिंदला ताब्यात घेऊन त्याच्या बऱ्हाणपूर येथील घराची झडती घेतली. त्यावेळी त्याने स्वतःच्या घरी चोरी केलेल्या दोन दुचाकी लपवून ठेवल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने मिलिंदला अटक करून दोन्ही दुचाकी जप्त केल्या. चौकशीत त्याने एक दुचाकी शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीतील पाळा शेतशिवारातून तर दुसरी दुचाकी ही गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे सांगितले. मिलिंद याला पुढील कारवाईसाठी शिरजगाव कसबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






