खंडवा जाणाऱ्या खासगी बसला अपघात, २० जखमी, आठ गंभीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

परतवाडा : अमरावतीहून मध्य प्रदेशच्या खंडवा येथे जाणाऱ्या‘चावला’ अंकित भरधाव खासगी बस शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता धारणी मार्गावरील सेमाडोह ते भवई दरम्यान रस्त्यावरून कलंडली. यात २० प्रवासी जखमी झाले. त्यापैकी आठ गंभीर आहेत. त्यांच्यावर सेमाडोह आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीमुळे बस दोनशे फूट खोल दरीत जाण्यापासून बचावली. अमरावती ते खंडवा फेरी करणाऱ्याजीजे ०६ एएक्स ५४२४ क्रमांकाच्या बसमध्ये सुनीता अंकुश चिमोटे, मनीषा बाबूराव डोंगरे, सरस्वती शोभेलाल बेठे, साबूलाल नत्थू जामूनकर, आर्यन सुरेश भुसुम, राजू सुखदेव पाटील, कुंजू नंदू चिलटे, शेख हारुन अशी गंभीर जखमींची नावे आहेत. किरकोळ जखमींमध्ये रामू धाजू मेटकर (वय २३, रा. चिखली), महेश रामू मावसकर (वय २२, रा. माखला), पार्वती विनोद जामूनकर (वय २५, रा. माखला), सुखदेव साबूलाल जामकर (वय ४५, रा. माखला), प्रियंका नरेश चिलाटे (वय २४, रा. जमण्या), बरखा रवी सतवासे (वय २०, रा. परतवाडा), कमल रवी सतवासे (वय ४५, रा. परतवाडा) आदींचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेने जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. गणेश पाटील व डॉ. सुषमा इंगोले यांनी प्रथमोपचार करून त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. घटनेची माहिती चिखलदरा पोलिसांना देण्यात आली आहे. काचा घुसल्या, हात-पाय मोडले, डोके फुटले भरधाव बस रस्त्याच्या कडेला कोलमडून घासत गेल्यामुळे बसमधील प्रवाशांना गंभीर जखमा झाल्या. अनेकांच्या हाता-पायात काच घुसल्या असून, डोके फुटण्यासह हात-पाय मोडल्याची प्राथमिक माहिती डॉ. गणेश पाटील यांनी z24news.dreamhosters.com ला दिली.

सुरक्षा भिंतीमुळे बस बचावली परतवाडा ते धारणी मार्गावर बुरड घाट ते हरिसालपर्यंत पूर्णतः घाट वळण आहे. नवखे चालक वाहन भरधाव चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचा प्रकार या अपघाताने पुन्हा एकदा उघडकीस आला. तथापि, रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंत असल्यामुळे ती बस खोल दरीत जाण्यापासून वाचली असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!