
अचलपूर : अब्बासपुरा, सरमासपुरा येथे गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास विजेच्या उच्च दाबामुळे २७ घरांतील उपकरणे जळाली. तेथे मागील दहा दिवसांपासून अनियंत्रित विद्युत पुरवठा होत आहे. यादरम्यान ६ जूनच्या दुपारी २ च्या सुमारास विजेचा दाब अचानक वाढला. त्यामुळे सुधीर राईकवार, राजेश बोकडे, विठ्ठल डहाके, सुरेश रोडगे, प्रवीण कोल्हे, मोहम्मद जावेद, भास्कर कोरडे, चंद्रशेखर पखाले, दिलीप पखाले, अब्दुल बशीर, रमेश बोरकर, मनोज बोरकर, गजानन धुरधर, विकी बोरकर, स्वप्निल खोकले, प्रशांत वाट, गोविंद खळगे, कराडे यांच्या घरातील कूलर, टीव्ही, कॉम्प्युटर, पंखे, फ्रीज, दिवे, मिक्सर, होम थिएटर, प्रिंटर आदी उपकरणे उच्च दाबामुळे जळाली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 55






