मामाच्या घरी आलेल्या भाचीचा धरणात बुडून मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखलदरा : उन्हाळी सुटीत एक दिवसापूर्वी गौलखेडा बाजार येथे मामाच्या घरी आलेल्या नऊ वर्षीय भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली.

पायल सुरेश धिकार (९, रा. सलोना) ही आईसह गौलखेडा बाजार येथे मामा रवी मावसकर यांच्या घरी आली होती. शुक्रवारी सकाळी कपडे धुण्यासाठी नजीकच्या चंद्रभागा धरणावर असलेल्या आऊटलेटवर ती मावशीसोबत गेली होती. पाय घसरल्याने खोल पाण्यात ती बुडाली. लगोलग काही नागरिकांनी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु ती सापडली नाही. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षांतर्गत शोध व बचाव पथकाला पाचरण करण्यात आले. रेस्क्यू टीमने गोताखोरांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. चिखलदरा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, श्रीकांत खानंदे यांच्यासह अमरावतीहून आलेल्या रेस्क्यू टीमचे दीपक डोरस, दीपक पाल, विशाल निमकर, गजानन वाडेकर, दिलीप भिलावेकर, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे, गणेश जाधव, आपदा मित्र भागीरथी जामूनकर, अजय सावरकर, विनायक बेलसरे, साहेबलाल बेठे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

बोटीच्या साहाय्याने कृत्रिम लाटा रेस्क्यू टीममधील गोताखोरांनी गळ व हुकाच्या साहाय्याने शोधकार्याला सुरुवात केली. बोटीच्या साहाय्याने कृत्रिम लाटा तयार करण्यात आल्या. या त्यांच्या प्रयत्नानंतरच पायलचा मृतदेह हाती लागला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!