मामाला नाही जमलं, भाच्यानं करून दाखवलं!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती: माजी राज्यपाल तथा रिपाइंचे नेते दिवंगत रा. सू, गवई आणि दे. झा. वाकपांजर यांच्या मुशीत राजकारण, समाजकारणाचे धडे घेणारे बळवंत वानखडे यांना पहिल्याच प्रयत्नात थेट खासदार झाले. मात्र त्यांचे मामा दे. झा. वाकपांजर यांनी चारवेळा विधानसभेची निवडणूक लढविली पण त्यांना एकदाही आमदार होता आले नाही. म्हणूनच जे मामाला जमलं नाही, ते भाच्यानं करून दाखविले, अशीच काहीशी प्रचिती काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वानखडे यांच्या रूपानं पुढे आली आहे. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात दे. झा. वाकपांजर हे रा. सू. गवई यांचे प्रामाणिक कार्यकर्ते अशी ओळख होती. त्यामुळेच रा. सू, गवई यांनी वलगाव विधानसभा मतदारसंघातून १९९४ आणि १९९९ अशा दोन टर्ममध्ये दे. झा. वाकपांजर यांना रिपाइंची उमेदवारी दिली होती. तसेच दर्यापूर विधानसभेतून १९९० आणि २००४ मध्ये सुद्धा दे. झा. वाकपांजर निवडणूक लढले. मात्र त्यांना वलगाव अथवा दर्यापुरातून आमदार होता आले नाही. परंतु, दे. झा. वाकपांजर यांचे भाचे असलेले बळवंत वानखडे हे २०१९ मध्ये दर्यापूरचे आमदार झालेत. आमदारीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच आता २०२४ मध्ये अमरावती लोकसभेचे खासदार होत दिल्ली गाठणार आहे. एकंदरीत बळवंत वानखडे यांच्या नशिबी राजयोग असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद सदस्य असताना दर्यापूरचे आमदार झाले नि आमदार असताना आता खासदार झाले, असा सुवर्णयोग बळवंत वानखडे यांच्या वाट्याला आला आहे.

होमपीच’वर बळवंत वानखडे आघाडीवर दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून बळवंत वानखडे यांना ८,६७१ मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना ७९१७२ इतकी मते मिळाली असून, काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना ८७८४३ मते घेतली आहे. एकंदरीत होमपीचवर वानखडे हे आघाडीवर आहेत. प्रहारचे दिनेश बूब यांना २०९६२ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दर्यापूर मतदारसंघातील एकूण एक गावे पिंजून काढली. विशेषतः रामेश्वर अभ्यंकर यांनी अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, असदपूर, आसेगाव, रासेगाव, येवदा, निमखेड बाजार, चौसाळा आदी गावांत बैठकी, कॉर्नर सभा, रॅली काढून बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी जिवाचे रान केले.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!