केवळ मेळघाटातील दुर्गम भागाच्या शिक्षकांची होणार सुगम भागात बदली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखलदरा : शिक्षकांच्या दोन वर्षां पासून जिल्हा परिषद रखडलेल्या जिल्हांतर्गत बदल्या आता ऑनलाइन प्रणालीने शासनस्तरावरून होणार आहेत. याबाबतचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. विशेष म्हणजे, ही बदली प्रक्रिया संपूर्ण राज्यात केवळ अमरावती जिल्ह्यातील ‘दुर्गम’ मधील शिक्षकांना ‘सुगम’ मध्ये बदलीकरिता राबविण्यात येणार आहे. मेळघाटात खितपत पडलेल्या १०३५ शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

मागील दहा ते बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत अमरावती जिल्ह्यातील ‘दुर्गम’ (मेळघाट) भागातील शिक्षकांना या आदेशाने दिलासा मिळणार आहे. त्यांच्या सुगम क्षेत्रातील बदलीचा मार्ग अखेर सुकर झाला आहे.

लोकसभेची आचारसंहिता संपताच मेळघाटातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी शासनस्तरावरून केवळ अमरावती जिल्हा परिषदेकरिता संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत आहे. प्रहार शिक्षक संघटनेने दुर्गम मधील शिक्षकांच्या बदलीबाबत विभागीय आयुक्तांकडे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या विभागीय बैठकीत शासनस्तरावर प्रस्ताव दाखल करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांच्यामार्फत केली होती. संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी वारंवार मागणी लावून धरली होती. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षक बदली बाबतची प्रक्रिया केव्हा राबविणार याकडे बदलीसाठी इच्छूक असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिक्षक बदलीसाठी प्रहार शिक्षक संघटनेने यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

दुर्गममधून सुगमचे आदेश दुर्गम मधील शिक्षकांना सुगम क्षेत्रात बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडून शासनस्तरावरून पाठविण्यात आला होता. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी नितीन पवार यांनी दुर्गम मधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत तत्काळ कार्यवाहीचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.

राज्यात केवळ अमरावती दुर्गम शिक्षकांच्या बदली प्रक्रिया बाबत शासनस्तरावरून संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून विन्सीस या पुण्यातील कंपनीला याबाबतचा एक वर्षाचे कंत्राट देण्यात आले आहे, हे उल्लेखनीय. शिक्षकांची माहिती अद्ययावत झाल्या वर लवकरच सॉफ्टवेअर बदली करिता ‘रन’ होणार आहे.

दुर्गम मधील १०३५ शिक्षक एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे नोकरी करीत आहेत. त्यांना दर तीन वर्षांनी बदली मिळावी व त्यांच्या जागेवर कधीच दुर्गममध्ये काम न केलेल्या शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, असे रोटेशन धोरण राबविणे गरजेचे आहे. दुर्गम मधून सुगम भागात होण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार प्रयत्न करण्यात आले.

– महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!