
धामणगाव रेल्वे : महिला खूप वेळा मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा ती थांबविण्यासाठी गोळ्या घेतात. ही बाबै आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा गोळ्या घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले. महिलांमध्ये मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातून एकदा ती प्रक्रिया महिलांच्या शरीरात होत असते. पण, याला धार्मिक बाबींशी जोडल्याने किंवा इतर कारणांनी अनेकदा महिलांना मासिक पाळी उशिरा यावी, असे वाटते. धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा इतर बाबींमुळे काही महिला मासिक पाळी लांबविण्यासाठी हार्मोनल गोळ्या घेतात. पण, या गोळ्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
महिला हार्मोनल पिल्सचा वापर करताना दिसून येतात. अशा गोळ्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्लाही घेत नाहीत. मात्र अशा प्रकारामुळे हार्मोन्सवर परिणाम होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा गोळ्यांचे सेवन केल्यास मासिक पाळीमध्ये अनियमितता येऊन ती बंद होण्याचे तसेच प्रजननासंबंधी समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
– डॉ. सविता अप्तुरकर, स्त्रीरोगतज्ज्ञ, धामणगाव रेल्वे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या नकोच कोणतीही आरोग्याची समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्ळ्या घेऊ नयेत. बरेचदा सल्ल्याविना गोळ्या घेतल्यास त्याचे शरीरावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असा प्रकार टाळावा.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






