दारव्हा पं. स. रोजगार हमी विभागात शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंचन विहीर योजनेत सावळा गोंधळ

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर : दारव्हा पंचायत समिती महात्मा गांधी रोजगार हमी (MRGS) विभाग भ्रष्टाचार चे अड्डा बनले की काय अशी ओरड आता लाभाथ्यर्थ्यांमधून सुरू झालेली आहे कारण या विभागात पैसे घेतल्याशिवाय कोणतीच फाईल समोर सरकत नसल्याची खमंग चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे. पैसे घेतल्याशिवाय संबंधित अधिकारी प्रशासकीय मंजुरी देत नसल्याची माहिती काही लाभार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटी वर दिली आहे. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्या वर (MRGS) महात्मा गांधी रोजगार विभागाची सर्वस्वी जबाबदारी असते यांच्याच हाताखालून सर्व योजनांच्या फाईल मंजुरी साठी पुढील अधिकाऱ्यांजवळ जातात मात्र इथेत लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे सहाय्यक कार्यक्रमअधिकारी हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून गटविकास अधिकारी याची निष्पक्ष चौकशी करणार का असा ही प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे. सद्या महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत सिंचन विहीर ची योजना मोठ्या प्रमाणात राबविली जात असून मात्र या सिंचन विहीर योजनेत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्या आशिर्वादने मोठा साबळागोंधळ होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!