मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले असल्याने जिल्हा परिषद प्रशासन ‘अॅक्शन मोड’ वर आले आहे. पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती ओढवते. परिणामी विविध प्रकारचे आजारही बळावतात. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने मार्गदर्शक सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जारी केल्या आहेत.

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये पाऊस असतो. त्यामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाकडून काय खबरदारी घेतली पाहिजे व त्याबाबत कुठल्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सीईओ संतोष जोशी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना नैसर्गिक आपत्ती व पूर परिस्थिती नियंत्रणाबाबत करावयाच्या कामांचा आढावा घेऊन त्याबाबत सूचना केल्या. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय पथकांसह नियंत्रण कक्ष सुरू केले जाणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित जिल्ह्यात १ जूनपासून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर चोवीस तास साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात औषधसाठ्यांसह प्रत्येक उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग किट, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंशसाठी लागणाऱ्या लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

काय आहेत सूचना ? जिल्ह्यात संभाव्य पूरग्रस्त जोखीमग्रस्त नदीकाठच्या गावांची यादी प्रसिद्ध करून नदीकाठच्या गावांच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्याबाबत सूचना सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. संभाव्य पूरग्रस्त गावांमधील भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ५९ वैद्यकीय पथकांची नियुक्त्ती केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना ओ.टी. टेस्टद्वारे पिण्याच्या पाण्याची तपासणी, पुरवठा साधनांचे जलशुद्धीकरणाबाबत सूचना दिल्यात.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!