वाढीव पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
               मोबाईल नंबर : 7499602440

 

 

 

 

राळेगावात पाण्याचा प्रश्न; अमरावती मजीप्राकडे प्रस्ताव

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर : राळेगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. शहरातील नागरिकांना होणारा त्रास पाहता वाढीव पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे, सध्या स्थितीत असलेली पाणीपुरवठा योजना शहरासाठी कुचकामी ठरत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे, अनेक वेळा महावितरणाचा भारनियमन याचा फटका पाणीपुरवठा योजनेला बसतो आहे ,नगरपंचायत प्रशासनाने वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी नगरपंचायत ने 2022 मध्ये ठराव घेतला आहे केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 राज्य जलकृति आराखडा दोन बाबत पाच जुलै 2023 रोजी याला मंजूरात मिळाली, या योजनेसाठी 48.20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत सध्या स्थितीत हा प्रस्ताव मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण अमरावती यांच्याकडे प्रस्तावित आहे प्रस्तावना त्यांनी मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयाकडे जाणार आहेत, मंत्रालयात मंजुरी मिळाल्यावर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे योजनेला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

( दरडोई 35 लिटर पाण्याची तरतूद)

या योजनेमध्ये पाण्याचे मोठे पंप आहेत योजनेतून नागरिकांना दरडोई 35 लिटर पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. फिल्टर सोलर तसेच मोठी जलवाहिनी होणार आहे, शासनाने तातडीने योजना मंजूर केल्यास राळेगाव चा पाणीपुरवठा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे राळेगावकरांना दोन दिवसाआड स्वच्छ व शुद्ध पाणी मिळू शकेल

_____________________________________

नगरपंचायत मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आम्ही राळेगाव शहराकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला ,शासनाकडून प्रस्तावाला मान्यता सुद्धा मिळाली आहे. मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्रधिकरण अमरावती यांच्याकडून प्रस्तावाला तांत्रिक मान्यता या आठवड्यात मिळून प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे जाईल, त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाली की राळेगाव येथे वाढीव पाणीपुरवठा योजना अमलात येईल,

जानराव गिरी, उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती, नगरपंचायत राळेगाव

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!