महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती करणार लक्षवेधी आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

      संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नंबर :   7499602440

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : विद्यार्थी हिताच्या मागणीकडे शासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याने म.रा. प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जून रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.ही घोषणा राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी केली . संपूर्ण महाराष्ट्र होणारे आंदोलन हे यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा प्रखरपणे केल्या जाणार आहे. राज्य शासनाने संचमान्यता आणि शिक्षक निर्धारण संबंधाने १५ मार्च २०२४ रोजी निर्गत केलेल्या शासन निर्णयानुसार कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर व्यापगत होणार आहे. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना कमीपटाच्या शाळेत मानधनावर नियुक्त करण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इयत्ता१ ते ५, इयत्ता ६ ते ८ साठी शिक्षक आणि मुख्याध्यापक पदाचे नवनिर्धारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनात अडसर निर्माण करणारे आहे.तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे.यातून दैनंदिन अध्यापनाचे कार्य प्रभावित होत आहे.शाळेत कोणतीही सुविधा- न देता शिक्षकांच्या खासगी मालकीच्या मोबाइलचा सर्रास- वापर कार्यालयीन कामकाजासाठी करण्याची प्रशासनिक मानसिकता वाढत चालली आहे. अशैक्षणिक कामाचा तगादा आणि वेळीअवेळी- देण्यात येणाऱ्या सुचना, माहिती मागण्याचा हव्यास, दैनंदिन कामकाजात अडसर निर्माण करणारा ठरत आहे. शिक्षकांच्या गणवेश संहितेचा निर्णयसुद्धा शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर घाला असून, शिक्षकांच्या प्रती अविश्वास आणि समाजामध्ये शिक्षकांप्रती नकारात्मक – दृष्टीकोन निर्माण करणारा आहे.

तसेच अशैक्षणिक कामांसह शैक्षणिक गुणवत्तेच्या नावाखाली अनेकविध उपक्रमांचा भडीमार विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रस्त करणारा आहे. तेव्हा शिक्षकांना शिकवू द्या… विद्यार्थ्यांना शिकू द्या…या सामाजाभिमूख आणि विद्यार्थीहिताच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जून रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यवतमाळ शिक्षक समिती
जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, शिक्षक नेते ज्ञानेश्वर नाकाडे राज्य जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,जिल्हाकार्याध्यक्ष
रविंद्र उमाटे,महिला आघाडी प्रमुख सुनिता जतकर, कोषाध्यक्ष ओमप्रकाश पिंपळकर, उपाध्यक्ष संजय काळे, राधेश्याम चेले, ग्यानबा गुट्टे , असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष पारधी यांनी कळविले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!