शबरी, रमाई योजनेसाठी अर्ज केला का? घरकुल घ्या घरकुल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : शासनाच्या वतीने पक्के घर नसणाऱ्यांसाठी विविध घरकूल योजना राबविण्यात येतात. यामधून पात्र लोकांना लाभ दिला जातो. यामुळे अनेकांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात शबरी योजनेंतर्गत ७९०६ उद्दिष्टांपैकी ७४७६ घरकूल मंजूर झाली आहेत. यामधून ७२९४ आणि रमाई आवास योजनेंतर्गत ४९३१ उद्दिष्टांपैकी ४४७२ घरकुले मंजूर केलेली आहेत. यामधून ३८३४ घरकूल पूर्ण झाली आहेत. या घरकुलासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने विविध घरकूल योजना राबविण्यात येतात. या योजनेतून पात्र लाभार्थीना घरकूल झाल्यानंतर लाभार्थ्यांनी २६९ चौरस फूट बांधकाम करणे अपेक्षित असते. आहे. यासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रुपये अनुदान मिळते. तसेच घराचे अधिक काम झाले तर त्याचा खर्च हा लाभार्थीलाच करावा लागतो. त्याचबरोबर शौचालयासाठी वेगळे पैसे मिळतात. स्वच्छ भारत मिशन मधून त्यांचा निधी मिळतो घरकूल योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन जमा होत असतात.

अर्ज कोठे करायचा?

1)रमाई घरकुलासाठी लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेत झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.

2)शबरी घरकूल योजनेसाठी ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा लागतो.

अडचण काय?रमाई आणि शबरी  घरकूल योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी झाली. पण,निवडणूक आचारसंहितेमुळे काही प्रस्तावांना मंजुरी देता आली नव्हती.आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली असून लवकरच योजनेतील पात्र लाभार्थीना लाभ मिळणार आहे.

निकष काय?

शबरी योजना ही योजना हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. लाभार्थीकडे पक्के घर नसावे. त्याने यापूर्वी कुठल्याही घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी कुटुंबांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे.

रमाई योजना :1)रमाई आवास योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.

2)त्याच्याकडे पक्के घर नसावे. त्याने यापूर्वी कुठल्याही घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.

जिल्ह्यात शबरी घरकुल योजनेत ७,४५५ मंजूर घरकुलांपैकी ७,२९४ घरकुले पूर्ण झालीत. तर रमाई आवासचे ४,९३१ उद्दिष्टांपैकी ४,४७२ घरकुले मंजूर केली होती. ३,८३४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. प्रीती देशमुख,(प्रकल्प संचालक, डीआरडीए)

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!