
अमरावती जिल्हा परिषदेतील जवळपास ५२ शिक्षक व ९७ सहायक शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळणार आहे. ही प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओंशी या मुद्यावर विस्तृत चर्चा केली.
ही प्रक्रिया केली जात असताना निवडश्रेणीचे प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देशही त्यांनी दिलेत. विषय शिक्षकांना शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी, पेसा क्षेत्रात न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणे, बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे, आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. १ ते ३० जून दरम्यान प्रत्येक पंचायत समितीमध्ये सेवापुस्तिका अद्ययावत करणे व जुलैपासून भरारी पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. सभेला जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, कोषाध्यक्ष संजय साखरे, नीळकंठ यावले, सुभाष सहारे, गजानन बिडवाईक, उज्ज्वल पंचवटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






