
भातकुली : तालुक्यातील आसरा परिसरात शुक्रवारी अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे ळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली. टीनपत्रे उडाले. त्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. या पडझडीतून नागरिकांना सावरण्यासाठी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वात चमू धडपड करीत आहे.
आसरा गावामध्ये चक्रीवादळाने झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर कोसळल्याने मार्ग बंद झाले आहेत. काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. झेडपी शाळेची पडझड झाली. नुकसानग्रस्त भागाची नितीन कदम यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी सरपंच अशोक मोहोळ, परेश मोहोड, सचिन देशमुख, राहुल वानखडे, धीरज देशमुख, पंकज दहीकर, शिक्षक, आसरा ग्रामस्थ उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 55






