शहरातील दोघांकडून देशी कट्टा, दोन काडतुसे जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकाने ८ जूनरोजी घटांग ते परतवाडा मार्गावर सापळा रचून अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या दोंघांकडून देशी पिस्टल (कट्टा) व दोन काडतुसे जप्त केली आहेत. त्यांना परतवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस सूत्रांनुसार, मोहम्मद रुबा मोहम्मद खलील (३०, रा. इतवारा बाजार, चारा गल्ली, अमरावती) व मोहम्मद तौसीफ मोहम्मद सादिक (२३, रा. धरमकाटा, वलगाव रोड, अमरावती), अशी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस अधीक्षकांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार नेमलेल्या पथकाला दोन इसम घटांग ते परतवाडा मार्गाने देशी कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला होता.

यावेळी येथे दुचाकीने दोघे येताना दिसताच पोलिसांनी मोक्याच्या क्षणी त्यांना घेरून त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याकडून मॅगझिनसह एक देशी कट्टा, दोन काडतूस, एक रिकामे मॅगझिन, तीन मोबाइल व विनाक्रमांकाची दुचाकी, असा एक लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना परतवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपींनी देशी कट्टा व काडतूस कुठून मिळवले आणि त्याचा वापर कशासाठी करणार होते, याची सखोल चौकशी पोलिस त्यांच्याकडून करणार आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक सचिन पवार, अंमलदार युवराज मानमोठे, रवींद्र वन्हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक मंगेश मानमोडे यांनी ही कारवाई केली. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!