
संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नंबर : 7499602440
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर पाटणबोरी शाळा म्हटले की आठवते ते बालपण शाळेत केलेल्या गमती जमती, खेळ ,शिक्षकांनी दिलेला मार त्यातच दहावीचे शेवटचे वर्ष ,पहिली पासून तर दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मनात नसताना सुद्धा दहावीनंतर एकमेकांपासून वेगळे होण्याची वेळ येते.कोणी विज्ञान कोणी वाणिज्य कोणी पदवी कोणी पदविका जातो त्यानंतर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो कारण प्रत्येकजण आपल्या कामाला लागलेला असतो कोण कुठे माहिती नाही? अश्या परिस्थितीत भेट तर दूर साधं बोलनसुद्धा होत नाही आणि मग निमित्त होते श्री शिव छत्रपती महाविद्यालयात गेल्या तीस वर्षापूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठीच्या स्नेहमेळाव्याचे.
कित्ती वर्षांनी भेटतोय…..कसे आहेत सगळे……अशा अपुलकीच्या प्रश्र्नांपर्यंतचा संवाद शाळेच्या प्रांगणात रंगतो. १९९२ -१९९३ या वर्षातील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा तब्बल ३१ वर्षांनंतर स्नेह मेळावा गुरुवारी दि.३० ला श्री शिव छत्रपती महाविद्यालय,पाटणबोरी येथील पंडित बच्छराज व्यास सभागृहात पार पडला. शिक्षकांचे आगमन होताच पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येरकडे सर,प्राचार्य श्री शिव छत्रपती महाविद्यालय, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक नंदू देशपांडे सर, सागर अल्लुरवार सर, नेमनवार सर, गेडाम सर उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमची सुरवात करण्यात आली, तर वर्गमित्र मनीष अग्रवाल याला श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर माजी विद्यार्थ्याच्या हस्ते सर्व शिक्षकांचा शाल,श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमच्या अयोजनासाठी अभय राजुलवार,संतोष कायतवार, गणेश कैलासावर संतोष नक्षणे अनिल राजुलवार यांनी पुढाकार घेतला .तर आरती छल्लानि, गणेश कटकोजवार, रामेश्वर मोरे व संजय चवलेवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रमुख पाहुने जेष्ठ शिक्षक नंदू देशपांडे सर सागर अल्लुरवार सर नेमनवार सर गेडाम सर अध्यक्ष स्थावरून येरकडे सर मोलाचे मार्गदर्शन सर्व शिक्षकांनी माजी विध्यार्थ्याना केले. मार्गदर्शन करताना येरकडेसरांचा कंठ दाटून आला यावेळेस वातावरण भावुक झाले होते.दरम्यान, मेळाव्यास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आठवणी सांगितल्या.सर्वांनी आपला परिचय करून दिला. मनसोक्त गप्पा मारल्या.त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी नागपूर,यवतमाळ, चंद्रपूर माहूर,औरंगाबाद येथे बाहेर असूनही ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते.
एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविषयी माहिती दिली. यानंतर स्नेहभोजनचा आस्वाद घेन्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संगीत खुर्ची चा खेळ झाला ,गीत गायन गरबा, झाला त्या नंतर मनसोक्त नाच गाणे झाले सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, तीस वर्षानंतर एकत्र भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या. 31वर्षानंतर एकत्र आलो व भविष्यात पुन्हा सर्वांनी एकत्र यावे, असा मानस व्यक्त करून सर्वांनी जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रेम नरडलवार व सुनील भेंडारे ,प्रास्ताविक गजानन सिंगेवार आभार प्रदर्शन संतोष यांनी केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






