बडनेरा ते नाशिक मेमू ट्रेन आता झाली बारा डब्यांची

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

बडनेरा : बडनेरा ते नाशिक मेमू ट्रेन आता बारा डब्यांची धावायला सुरुवात झाली. त्याआधी ही ट्रेन आठ डब्यांची धावत होती. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत रेल्वेने हा बदल केला आहे. यापासून प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. १ जूनपासून ही गाडी १२ डब्यांची धावायला सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात बडनेरा- नाशिकदरम्यानचा पल्ला दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. नोकरीनिमित्त त्याचप्रमाणे इतर बऱ्याच कामांसाठी या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने गाडी क्रमांक ०१२११/१२ बडनेरा ते नाशिक मेमू, तसेच परतीची नाशिक ते बडनेरा गाडी १२ डब्यांची केली आहे. त्याआधी ही गाडी आठ डब्यांची होती. वाढती मागणी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दैनंदिन प्रवाशांना उत्तम सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने रेल्वे विभागाने ९ जूनपासून हा बदल केला आहे.

सदर गाडी बडनेरा येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि नाशिकला १९.४० वाजता पोहोचेल. त्याच दिवशी नाशिक येथून २१.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बडनेरा ते नाशिक दरम्यान मेमू ट्रेन ही प्रारंभी आठ डब्यांनी चालवली जात होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सर्व वयोगटातील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. वाढती मागणी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आता डब्यांमध्ये वाढ झाल्याचा निर्णय हा प्रवाशांसाठी दिलासादायक आहे.

महेंद्र लोहकरे,प्रबंधक, अमरावती रेल्वे स्टेशन

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!