
अमरावती : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून महिलेची १७.८० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
परतवाडानजीक दत्तनगर (कांडली) येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल ते २१ मे दरम्यान घडली. पोलिस सूत्रांनुसार, २९ वर्षीय महिलेने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली, ज्यात शेअर बाजारातील गुंतवणुकीत जास्त नफा देण्याविषयी सांगितले होते. या लिंकला क्लिक करताच ती महिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड झाली. त्यामध्ये आधीपासून समाविष्ट असलेल्या तीन कंपन्यांमध्ये महिलेने १९ लाख २७ हजार रुपये गुंतवले. त्यापैकी लाभांश १ लाख ४६ हजार ३०० रुपयांचाच तिला विड्रॉल करता आला.
महिलेने पैशांची निकड पाहून है ऑनलाईन गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रक्कम काढता आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने १० जून रोजी रात्री परतवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस तांत्रिक माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






