अंघोळीच्या मोहाने घेतला युवकाचा बळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ब्राह्मणवाडा थडी : पूर्णा प्रकल्पात अंघोळीसाठी मित्रांसमवेत उतरलेल्या ३२ वर्षीय युवकाचा बुडाल्याने मृत्यू – झाला. जिल्हा शोध व बचाव पथकाने त्याचा मृतदेह सायंकाळी सहानंतर शोधून काढला.पोलिस सूत्रांनुसार, मनीष देविदास – माकोडे (रा. शिरजगाव बंड) हा त्याच्या – दोन मित्रांसह मंगळवारी दुपारी १२ नंतर ब्राह्मणवाडा थडीपासून पाच किमी अंतरावर विश्रोळी येथील पूर्णा मध्यम – प्रकल्पावर गेला. तीनही तरुणांनी प्रकल्पामध्ये दुपारी सुमारे एक वाजता – अंघोळ केली. यादरम्यान मनीष हा बुडाला. त्यांनी परिसरातील नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले. घटनास्थळी लगेच ब्राह्मणवाडा थडी येथील पोलिस पथक ठाणेदार उल्हास राठोड यांच्या मार्गदर्शनात पोहोचले. जलसंपदा विभागाचे उपअभियंता अनुप खानवे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने सायंकाळी ६ च्या सुमारास मृतदेह शोधून काढला. त्यानंतर तो मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ब्राह्मणवाडा थडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!