
अमरावती : जुन्या गोपाल टॉकीज परिसरातील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. ११ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख श्याम चावरे (५३) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मयूर सतीश छोकर (३०, जुने गोपाल टॉकीजजवळ) याच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.चावरे हे पोलीस पथकासह गोपाल टॉकीजसमोरील सर्व्हिस गल्लीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले होते. मनपा व पोलिस पथक तेथे पोहोचले असता, मयूर छोकर याने पथकाला ‘तुम्ही येथे कसे काय आलात?’ अशी विचारणा केली. त्यावर चावरे यांनी तेथील अतिक्रमण हटविण्याबाबत माहिती दिली. त्यावेळी आरोपीने चावरे यांच्याशी वाद केला. चावरे व संपूर्ण स्टाफला अश्लील शिवीगाळ केली. धक्काबुक्की केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






