तासनतास वीज गुल नवसारी केंद्रावर गोंधळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : शहरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात रात्री बेरात्री तासनतास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने सर्वसामान्यांची झोप महावितरणने उडविली आहे. शहरात अजूनही अनेक भागांमध्ये महावितरणची मान्सूनपूर्व वीज यंत्रणा दुरुस्ती कामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळेच मंगळवारी रात्री नवसारी परिसरात तब्बल चार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित होता. यावेळी परिसरातील संतापलेले नागरिक तक्रारीसाठी नवसारी येथील – महावितरण केंद्रावर गेले असता तेथे कोणीच नसल्याचे आढळून आले. यावेळी तेथे निर्माण झालेल्या गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करून तक्रारीसाठी आलेल्या नागरिकांवर 1 गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.

 गेल्या महिन्याभरापासून महावितरणकडून पावसाळ्यात होणाऱ्या विद्युत उपकरणांची हानी टाळण्यासाठी मान्सूनपूर्व वीज यंत्रणा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामध्ये सैल झालेल्या दोन खांबामधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब: आणि त्यांचे ताण सुस्थितीत करणे, विद्युत तारांवर लोंबकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे यासारखी कामे सुरू आहेत. परंतु शहरात अनेक भागांतील ही कामे अजूनही पूर्ण झालेलीच नाही. त्यामुळेच मंगळवारी झालेल्या पावसामुळे विद्युत तारा तुटून नवसारी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी ५ वाजता बंद झालेला हा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा काही वेळाकरिता आलेली वीज ही पुन्हा खंडित झाल्याने स्थानिक परिसरातील नागरिक हे तक्रारीसाठी नवसारी महावितरण केंद्रावर पोहोचले असता येथे एक कंत्राटी कर्मचारी वगळता सर्वच कर्मचारी हे आपला फोन बंद करून गायब असल्याचे चित्र नागरिकांना दिसून आले. यावेळी वीज वितरण केंद्रावर तक्रारदात्यांची वाढती संख्या लक्षात घेता, काही वेळाने येथे पोलिसांना पाचारण करून तक्रारीसाठी आलेल्या नागरिकांच्याच विरोधात तक्रार दाखल करण्याची तंबी देण्यात आली. एकीकडे मोठ्या प्रमाणावर वीज बिल महावितरण ग्राहकांकडून वसूल करत असतानादेखील दोन महिन्यांपासून ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा देण्यास महावितरण अपयशी ठरले आहे. त्यात महावितरणचे संबंधित अधिकारी, कर्मचारी आपले फोन बंद करून ठेवत असल्याने ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची दखल कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा केवळ नवसारी भागातील प्रश्न नसून शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री गुल झाला होता. हे विशेष.

पावसामुळे विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ती दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला. नवसारी भागात रोज विद्युत पुरवठा खंडित होत असेल तर त्यासंदर्भातील माहिती घेऊन योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.

आनंद काटकर, (प्रभारी अधीक्षक अभियंता)

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने परिसरातील नागरिक नवसारी महावितरण कार्यालयावर गेले होते. तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. तसेच त्यांचे फोनही बंद होते. यावेळी येथे तक्रारकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.

– सागर मैदानकर,( वीज ग्राहक)

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013606
error: Content is protected !!