
संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल क्रमांक : 7499602440

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी उमरखेड तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा घेतला आढावा .
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर आज दिनांक 12 जून 2024 रोजी उपविभागीय कार्यालय येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीला उपस्थित उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे , उमरखेड तहसिलदार आर यु सुरडकर उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, उमरखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखडे, नगरपरिषद उमरखेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जामनोर, पुरवठा निरीक्षक श्री गुट्टे, सा बा विभाग श्री खसावत व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जलयुक्त शिवार, आयुष्यमान भारत , पांधण रस्ता, भूमी अभिलेख,पि एम आवास योजना, रमाई आवास योजना , शेतकऱ्याला पुरतील एवढे बी बियाणे व खते यांचा पुरवठा व्यवस्थित आहे. किंवा नाही त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. शेतकऱ्यांची पेरणीच्या वेळी तारांबळ होऊ नये म्हणून त्यांना योग्य वेळी खते बी बियाणे मिळणे अनिवार्य आहे. पी एम किसान योजनांचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढावी. शेतकऱ्याचे शेततळे किती झाले आहेत व शेतकऱ्याचे शेत तळे किती होणे बाकी आहे. या सर्व चालू कामाचा आढावा घेण्यात आला. उमरखेड डॉक्टर डी एच ओ, पी एस सी, येथील मॅट्रिम मशीन चालू आहे किंवा नाही, मेडिकल औषध उपचार व्यवस्थित होत आहे किंवा नाही याविषयी विचारणा करण्यात आली. सर्व नायब तहसिलदार व मंडल अधिकारी यांना ,चातारी दराटी ,ढाणकी, निगनुर, सोयीट उमरखेड या सर्व येथील कामाविषयी विचारणा करण्यात आली. त्यांच्या कामाचा तेथील आढावा घेण्यात आला. ई चावडी प्रकरणे पाहण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






