जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वाशीत विंहिंप-बजरंग दलाचे आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

वाशी -जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला के ल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता.

यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काल वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी हल्ले केले जातात. जम्मू काश्मिरमध्ये नुकतीच भाविकांच्या बस वर अतिरेक्यांनी हल्ला केला या हल्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन केले असून, अशा स्वरुपाच्या घटना वेळीच थांबणे गरजेचे आहे. अन्यथा बजरंग दलास याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी लागेल असाम इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना दिला.  यावेळी मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित व होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!