तरुणाचा जळालेला मृतदेह आढळला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती / टाकरखेडा शंभू: वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आष्टी गावालगतच्या एका शेतशिवारात २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला.

गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास ती घटना उघड झाली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. मात्र, मृतदेहावरील काही ठिकाणी असलेल्या जखमा पाहता, त्या तरुणाची आधी हत्या करण्यात आली व नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तो मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा मृतदेह दिसता क्षणी एका मजुराने याची माहिती पोलिस पाटलांना दिली. त्यामुळे वलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस उपायुक्त सागर पाटील व गणेश शिंदे यांच्यासह गुन्हे शाखा प्रमुख गोरखनाथ जाधव व सीआययू पथक देखील दाखल झाले. घटनास्थळी आढळलेल्या बाबी फॉरेन्सिक चमूने ताब्यात घेतल्या आहेत. हा मृतदेह अन्य ठिकाणाहून येथे आणून फेकण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या हातामध्ये कडे आहे तथा छातीवर ‘जान’ असे लिहिले आहे. वलगाव पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याची छायाचित्रे व्हायरल केली आहेत. घटनास्थळावर श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मृताची ओळख पटल्यानंतर ही हत्या की आणखी काही, हे स्पष्ट होणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!