राष्ट्रीय लोक अदालत 27 जुलैला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत शनिवार, दि. 27 जुलै, रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिक तसेच पक्षकारांनी लोकअदालती समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले लोकअदालती समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालयांशी संपर्क साधावा. तरी संबंधितांनी आपली प्रकरणे लोकअदालतीत सामंजस्याने व तडजोडीने मिटवावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. डी. कांबळे यांनी केले आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!