
संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नंबर : 7499602440
विदर्भ प्रतिनिधी प्रतिनिधी संजय कारवटकर : संत भोजाजी महाराज आजनसरा येथुन पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान करण्यात आले आहे,
पालकीला लागली विठू माऊलीच्या भेटीची ओढ लागलेली आहे,
दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत भोजाजी महाराजांची पालखी संत आजनसरा नगरीतून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी आज 12 जून रोजी आजनसरा येथून पंढरपूरसाठी रवाना झाली आहे. सर्व नियोजनाची तयारी संत भोजाजी महाराज संस्थान कडून पूर्ण झाली आहे. जवळपास शे दोनशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले आहे, पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहे.आजनसरा येथुन निघालेली पालखीचे दर्शन राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील भक्त जणांना मिळाले आहे दरवर्षीप्रमाणे आज आन्सर आहे तो निघालेली पालखी धानोरा येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या मंदिरात एक ते दीड तासासाठी थांबत असते व तेथे चहापाणी नाश्ता वगैरे घेऊन समोर प्रस्थान केल्या जात असते यावर्षी सुद्धा आजनसरायातून निघालेली पालखी धानोरा येथे आली व धानोरा वाशी यांना दर्शन देऊन समोर निघाली हे मात्र विशेष
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






