पूल वाहून गेल्याने किन्ही आणि चाचोरा गावाचा संपर्क तुटला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नबंर 7499602440

 

 

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : राळेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून राळेगाव तालुक्यातील किन्ही गावाजवळील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात पूल वाहून गेला . परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या पाच ते सात गावांचा संपर्क तुटला आहे.

किन्ही मार्गावरील गावालगतचा पूल दिनांक 14 जुन च्या सायंकाळी 5:50 आलेल्या पावसामुळे वाहून गेला आहे हा पूल इतका कमजोर आहे. अंदाजे तो पूल 45 वर्ष जुना काम आहे तो दरवर्षी थोडा थोडा पूल वाहून जात होता ह्या वर्षी तो पूल पूर्ण वाहून गेला पुराचे पाणी वाढल्याने ही अवस्था झाली. या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी अनेकदा किन्ही (जवादे) , येथील विद्यार्थी आणि नागरिकांनी केली होती. परंतु, यांची दखल लोकप्रतिनिधी व प्रशासनाने न घेतल्याने हा पूल वाहून गेल्याची चर्चा किन्ही जवादे येथील नागरिक करित आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!