राळेगांव तालुका पर्यावरण संवर्धन व विकास समिती संघटक पदी. अरविंद कोडापे यांची नियुक्ती…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : राळेगांव तालुक्यातील विंहरगाव येथील व सोशल मीडिया,सामाजिक क्षेत्रात काम करणारे अरविंद झित्रूजी कोडापे यांची राळेगांव तालुका संघटक पदी निवड करण्यात आली.

पर्यावरण संवर्धन व विकास समिती जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र त्यांना आज देण्यात आले.
यावेळी विनोद दोंदल अध्यक्ष जिल्हा पर्यावरण संवर्धन व विकास समिती यवतमाळ, राळेगांव तालुका अध्यक्ष आशिष भोयर, अजय मांडवकर तालुका उपाध्यक्ष राळेगांव, यांच्या उपस्थितीत सदर नियुक्ती करण्यात आली.पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे याची विचारधारा आदरणीय विनोद दोंदल यांचे सक्षम नेतृत्व, तथा सर्व पर्यावरण पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण संवर्धन व विकास समिती चे काम राळेगांव तालुका सह शहरात अधिक मजबूत करू असे अरविंद कोडापे यांनी नियुक्ती पत्र देते वेळी व्यक्त केले.अरविंद कोडापे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समिती संघटक पदी निवड झाल्याने राळेगांव तालुक्यात अरविंद कोडापे यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. झाडे लावा,झाडे जगवा झाडे वाचवा…

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!