
हिंगोली : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०३ शाळांना वर्गवाढ दर्जोन्नतीसाठी मान्यता देण्यात आली आहे; परंतु संबंधित वर्गाच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यासाठी शाळांना पुस्तके मिळाली नसल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना पुस्तके कशी वाटप करावीत, असा प्रश्न पडला आहे. शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा. पुणे यांच्या पत्रानुसार प्राथमिक शाळांना पाचवी वर्ग जोडणे व सातीव पर्यंतच्या शाळांना आठवी वर्ग जोडण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या होत्या. हिंगोली जिल्हा परिषदेकरीता एकूण ३७७४ पायाभुत पदे मंजूर असून संच मान्यतेनुसार ३५६३ पदे मंजूर झालेली आहेत. पायाभुत पदाच्या मर्यादेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिली ते चौथीच्या शाळांना पाचवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक, माध्यमिक वर्ग जोडण्यास तसेच पहिली ते सातवीच्या शाळांना इयत्ता आठवी व आवश्यक असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
मुख्याध्यापकांसमोर उपस्थित झाला प्रश्न
त्यानुसार जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार यांनी जिल्ह्यातील १०३ जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गवाढ दर्जोन्नतीसाठी मान्यता देऊन आदेश काढले. त्यात कळमनुरी तालुक्यातील पाचवी दर्जावाढ देण्यात आलेल्या वर्गामध्ये प्राथमिक शाळा चिंचवाडी, देववाडी, झुनझुनवाडी, गुंडलवाडी, वसफळ, डोंगरकडा साखर कारखाना, शिवणी खु., खरवड, मोरवाडी, रामवाडी, म्हैसगव्हाण, पुयणा, करवाडी, हारवाडी, रेणापूर, उमरदरा, वंजारवाडी, आराटी, बिबथर, डिग्रस कों., गोर्लेगाव, बोल्डावाडी खु., शेवाळा (मराठी), आखाडा बाळापूर, हनुमाननगर, बऊर, काळ्याची वाडी, पावनमारी, बिबगव्हाण, हिंगोली तालुक्यातील आनंदनगर, कारवाडी, मालवाडी, चिखलवाडी, शाखा क्रमांक २ वाढोणा, आजम कॉलनी हिंगोली, बेलवाडी, देऊळगाव राजा, आंबा तांडा, हिंगणी, औंढा नागनाथ तालुक्यातील जलालपूर, वसमत तालुक्यातील महंमदपुरी वाडी, सिंगी, हिरडगाव, चोंडी स्टेशन, सेनगाव तालुक्यातील शिवणी खु., खैरी, काळाखेडा तांडा, मुंगसाजी नगर तर इयत्ता आठवी दर्जावाढ देण्यात येणारे वर्गवाढमध्ये सेनगाव तालुक्यातील जामदया, गणेशपूर, तळणी, रिधोरा, खुडज, उटी ब्रम्हचारी, वेलतुरा, केलसुरा, बोरखडी पी., भगवती, गुगुळ पिंप्रीर, म्हाळशी, मन्नास पिंपरी, औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगव्हाण, उंडेगाव, हिंगोली तालुक्यातील इडोळी, भिरडा, केसापूर, अंभेरी, माळहिवरा, कानडखेडा बु., वरूड गवळी, खांबाळा, कोथळज, राहोली बु., कलगाव, घोटादेवी, कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा, ढोलक्याची वाडी, सांडस त.नां., भोसी, चिखली जुनी, चिखली नवी, दाती, फुटाणा, कुंभारवाडी खंडोबा, तोंडापूर, बेलथर, चिंर्चोडी, बेलमंडळ, गौळबाजार, जामगव्हाण, वरूड, वसमत तालुक्यातील वाघी, सावंगी बु., करंजाळा, पांगरा शिंदे, कळमनुरी तालुक्यातील पाचवी दर्जावाढीसाठी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा साखर कारखाना तर इयत्ता सातवी दर्जा वाढसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील रूपूर कॅम्प आणि उर्दू माध्यमच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीसाठी दर्जावाढ देण्यात येणार आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, शेवाळा, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ उर्दू, जवळा बाजार उर्दू या प्राथमिक शाळांना (Hingoli School) दर्जावाढ देण्यात आली असून या शाळांनी सन २०२४-२५ पासून वर्गवाढ सुरू करून त्याबाबतची नोंद यु-डायस प्लस या सरल प्रणालीवर करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पाठ्यपुस्तके मिळाली नाही; वाटप कशी करावीत
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पाचवी व आठवी वर्गवाढ दर्जोन्नतीसाठी १०३ प्राथमिक शाळांना मान्यता देण्यात आली आहे; परंतु या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यासाठी शाळांना पुस्तके मिळाली नाहीत; मग शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके कशी वाटप करावीत, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर पडला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






