
संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नंबर : 7499602440

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे दि. १६/०६/२०२४ रोजी फिर्यादी नामे अमोल प्रकाश दुधणकर वय ३६ वर्षे रा. रूंझा ता. केळापुर जि. यवतमाळ यांनी जबानी रिपोर्ट दिला की, यातील फिर्यादी हा दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी १०/३० वा चे सुमारास मोहदा येथील बँकेतुन पैसे काढण्याकरीता त्यांची काळया रंगाची ज्यास निळया पट्ट्या असलेली स्प्लेंडर प्लस मोसा क. MH 31 BX 3352 ची गाडी घेवुन मोहदा येथे जावुन तेथील ग्रामपंचायत समोर गाडी उभी करून बँकेतील काम संपवुन दुपारी १२/०० वा बाहेर आला असता ग्रामपंचायत समोर ठेवलेली कोणातरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे लक्षात आल्याने पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे तक्रार केली असता मा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश झांबरे यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंथे व त्यांचे पथकाने कौशल्यपुर्ण तपास करून यातील आरोपी नामे मयुर दिलीप खडसे वय २४ वर्षे रा. मंगी पोस्ट दहेगाव ता. राळेगाव याचे नाव निष्पन्न करून पोस्टे वडकी पोलीसांचे मदतीने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा त्याचे राहते गावी मंगी येथे चोरीतील मोटार सायकल क. MH 31 BX 3352 सह घरी हजर मिळुण आला असता चोरीतील मोटारसायकल तसेच आरोपीस ताब्यात घेवुन पोलीसांनी आरोपीस अटक केले आहे.
सदर कार्यवाही मा. श्री. डॉ. पवन बन्सोड, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ. मा. श्री. पियुष जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक, यवतमाळ. मा. श्री. रामेश्वर वेंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री. दिनेश झांबरे पोलीस स्टेशन पांढरकवडा, पोउपनि योगेश रंथे, पोलीस स्टाप पोहवा / प्रमोद जुनुनकर, मारोती पाटील, पोलीस नाईक / सचिन काकडे, राजु बेलयवार, राजु मुत्यालवार, छंदक मनवर, गौरव नागलकर, पोस्टे वडकी येथील पोहवा विलास जाधव, अंकुश पाथोळे यांनी केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






