
संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी
मोबाईल नंबर : 7499602440

ट्रॅव्हल्स ने दुचाकीला धडक माय व लेक जागीच ठार
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे दि, 15 तारखेला ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक दुचाकी वरील आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुलाचे नाव आकाश वाघमारे वय तीस वर्ष व आरती वाघमारे वय 55 वर्ष राहणार हिंगणघाट या दोघांना ट्रॅव्हल्स ने धडक दिली त्या धडकेत दोघेही जागीच ठार झाले आहे .वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील वना नदीवरील पुलावर राष्ट्रीय महामार्ग 44 वरील अपघात झाला, हे वर्धेवरून हिंगणघाट कडे येत होते तर नागपूर कडून हैदराबाद कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने पुलाजवळ धडक दिली आई व मुलगा अपघातात जागीच ठार झाल्याने परिसरात शोक कळा मावळली आहे काही वेळ राष्ट्रीय महामार्ग 44 वरील वाहतूक विस्कळीत झाली होती हिंगणघाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे .
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






