
अमरावती : दोन दशकांपासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. जिल्ह्यात दरदिवशी एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे दाहक वास्तव आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. यंदा पाच महिन्यात तब्बल १४३ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. शासन प्रशासन याविषयी गंभीर नसल्याने हे सर्व शेतकरी अस्मानी, सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहे. जिल्हा प्रशासनात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल ५३१९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे. यापैकी शासन मदतीसाठी २७७४ प्रकरणे पात्र ठरली आहेत, तर मृत २७०२ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ७०००० हजारांची रक्कम बँकेत पाच वर्षांसाठी जमा करण्यात आली, तर ३० हजारांची रोख मदत देण्यात आली आहे. या मदतीच्या निकषातही १८ वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नाही, हे येथे उल्लेखनीय. नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यात शेतकरी पिचला जात आहे. यामुळे वाढलेले बँकेचे व खासगी सावकारांचे कर्ज, कर्जासाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे जिल्ह्याचे धगधगते वास्तव आहे. ती मृत्यूंची मालिका थांबलेली नाही.
या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण आदी.शासन योजनांचा लाभ मिळेना शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. मात्र, या योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. जागतिक बँकेच्या सहकार्याने उभारलेला ‘केम’ प्रकल्प पांढरा हत्ती ठरला. शेतकऱ्यांचे समुपदेशन होत नाही. विभागीय आयुक्तांच्या सुचनेप्रमाणे शेतकरी आत्महत्यांच्या क्लस्टरमध्ये कुठलेही काम सुरू झाले नाही.
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही केवळ घोषणाच ठरली आहे. शासन, प्रशासन याकडे गंभीरतेने पाहत नाहीत. त्यामुळे हे सर्व शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत.
प्रवीण राऊत, (शेतकरी अभ्यासक)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






