कालूने चक्क तडीपारीत असताना केला खुनाचा ‘प्रताप’, पार्टीही केली!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : शेजारी राहणाऱ्या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकजण हा तडीपार असल्याचे उघड झाले आहे. तडीपारीचे आदेश डावलून तो वलगावात परतला व त्याने चक्क खून करण्याचा ‘प्रताप’ केला. शेख नदीम शेख नबी ऊर्फ कालू (३२, रा. सतीनगर, वलगाव) असे तडीपारी काळात खून केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचे नाव आहे. वलगाव पोलिसांनी कालूविरुद्ध तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जून रोजी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. तडीपारी डावलून घरी येत त्याने चक्क खून केल्याने वलगाव पोलिसांच्या डीबीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वलगाव ठाण्याच्या हद्दीतील आष्टी शिवारात १३ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला होता. त्याप्रकरणी वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालविले. दरम्यान, १४ जून रोजी सकाळी तो मृतदेह प्रताप मालवे (३०, रा. सतीनगर, वलगाव) याचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यात यशस्वी ठरलेल्या गुन्हे शाखा युनिट-१ ने मग आरोपींच्या चेहरे शोधून काढले. याप्रकरणी वलगावऐवजी क्राईमनेच महम्मद तन्वीर म. सादिक (२५) व शेख नदीम शेख नबी (२७, दोन्ही रा. सतीनगर, वलगाव) या दोघांना १४ जून रोजी रात्री अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर शेख नदीम हा तडीपार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपींनी प्रतापसोबत मद्यपान केले. नंतर त्याला आष्टी शेतशिवारात नेऊन त्याचा खून केला, हे विशेष कारखान्याजवळून घेतले होते ताब्यात आरोपी शेख नदीम ऊर्फ कालू हा वलगावच्या सतीनगर भागातील मकसूद यांच्या कारखान्याजवळ बसला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली होती. त्याआधारे १४ जून रोजी रात्री आठच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. तडीपार असताना शहरात कसा आला, अशी विचारणा त्याला केली असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे गुन्हे शाखेचे अंमलदार फिरोजखान यांनी त्याला वलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसी खाक्या बसताच त्याने प्रताप मालवेच्या खुनाची कबुली दिली.

दोन आरोपींपैकी कालू हा तडीपार आहे. त्याला सतीनगर भागातूनच १४ जून रोजी रात्री ताब्यात घेण्यात आले होते. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे.
– वैभव पानसरे, (ठाणेदार, वलगाव)
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!