गर्भवती प्रेयसीसोबत राहायला तयार; मात्र लग्न नाही !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : लग्नाचे आमिष देत प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतरही प्रियकराने लग्नास ठाम नकार दिला. पथ्रोट ठाण्याच्या हद्दीत ती घटना उघड झाली. याप्रकरणी २० वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी १५ जून रोजी शुभम तोटे (२१, रा. धामणी) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गर्भवती प्रेयसीसोबत आपण राहायला तयार आहोत; मात्र लग्न करणार नाही, असा पवित्रा त्याने घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पथ्रोटचे ठाणेदार सुनील पाटील यांनी आरोपीला १५ जून रोजी तातडीने अटक केली. त्याला दुपारी न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस
सूत्रानुसार, आरोपी व फिर्यादी पीडिता हे परस्परांचे नातेवाईकदेखील आहेत. त्या दोघांमध्ये सन २०२२ पासून प्रेमसंबंध आहेत. त्यातून त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, केवळ तुझ्यावर प्रेमच करत नाही, तर लग्नदेखील करणार आहे, अशी बतावणी त्याने केली. दरम्यान, २१ मार्च रोजी ती तिच्या घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी गेला. लग्न करण्याची बतावणी करून तिच्याशी शारीरिक संबंधदेखील केले. त्यानंतरदेखील लग्नाचे आमिष देत त्याने वारंवार त्या तरुणीचे लैंगिक शोषण केले.

२० वर्षीय पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला शनिवारी तत्काळ अटक केली. आरोपी चार दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.
– सुनील पाटील, (ठाणेदार, पथ्रोट)
तीन महिन्यांची गर्भवती दरम्यान, रुग्णालयीन तपासणीअंती ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. आरोपी शुभमचे नाव समोर आले. तिने त्याला आपण गर्भवती असल्याचे सांगून लग्न करण्याची मागणी केली. मात्र, त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्याला अनेकांनी समजावूनदेखील सांगितले. मात्र, तो बधला नाही. आरोपीने लग्नाच्या आमिषाआड केवळ आपले लैंगिक शोषण केल्याचे लक्षात येताच ती पथ्रोट पोलिसांत पोहोचली तथा तक्रार नोंदविली.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!