
अमरावती : केंद्र सरकारने सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत छतावर सौरऊर्जा उभारणीद्वारे घरांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत ३०० युनिट वीज ग्राहकांना मोफत मिळणार आहे. वीज निर्मितीसाठी रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. पात्र कुटुंबांना मोफत वीज मिळणार असून, यामध्ये थेट सबसिडी लोकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ग्रामीण भागातील विजेची समस्या सोडवून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूर्यधर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सोलर पॅनल व इतर यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनामार्फत काही प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये घरांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी सौर पॅनलच्या खर्चाच्या ४० टक्के म्हणजेच जास्तीत जास्त ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देखील दिले जाणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
काय आहे पंतप्रधान सूर्यघर योजना? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेकरिता घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्याची घोषणा केली. सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना जाहीर केली.
कोणाला लाभ मिळणार? या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पीएम सूर्यघर या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर जागेची पाहणी केली जाईल व सौर प्लेट उपलब्ध होतील.
निकष काय?पर्याप्त जागा उपलब्ध असल्यास व संबंधितांनी अर्ज केल्यास योजनेचा लाभ दिला जाईल. योजनेच्या लाभासाठी घर हे लाभार्थ्यांच्या नावे असणे, त्याचबरोबर वीजबिल व पासपोर्ट फोटो आवश्यक आहे.जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन योजनेंतर्गत घराच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसविण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना अनुदानही मिळणार आहे. त्याचबरोबर या उपक्रमामुळे वीज ग्राहकाला आपले वीजबिल शून्यापर्यंत कमी करणे देखील शक्य होईल, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






