अमरावती : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता पात्र २.७० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी वाराणशी येथून एका क्लिकद्वारे ही प्रक्रिया करणार असल्याची चर्चा प्रशासनात आहे.
निकषाची पूर्तता करण्यासाठी ५ ते १५ जूनपर्यंत गावागावांमध्ये शिबिर घेण्यात आले. ही मुदत आता संपल्याने मंगळवारपासून पात्र २,६९,६४४ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यात अचलपूर तालुक्यात २१७१७, अमरावती १६२१०, अंजनगाव सुर्जी १९०७५, भातकुली १५८२३, चांदूर रेल्वे १३७६२, चांदूरबाजार २६१६९, चिखलदरा १०३०६, दर्यापूर २३९६४ धामणगाव रेल्वे १७६९७, मोर्शी २४८५९, नांदगाव खंडेश्वर २२६८९, तिवसा १४९८४ व वरूड तालुक्यात २६२९५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या हप्त्यानंतर लाभार्थी झाले कमी पहिल्या टप्प्यात ३,४४,९१५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता. त्यानंतर अपात्र शेतकऱ्यांची नावे कमी झाली व ई- केवायसी व आधार लिकिंग नसल्याने योजनेचा लाभ मिळाला नव्हता. मात्र, अटीची पूर्तता केल्यानंतर त्यांना लाभ मिळत आहे. यानंतर ९१,१२१ शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचा लाभ मिळाला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 49






