
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर
मोबाईल नंबर : 7499602440

यवतमाळ :- शहरात पुन्हा लुटारूंनी डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे. सोनसाखळी चोराने मंगळवारी रात्रीच्या वेळी दोन महिलांच्या गळ्यातून दागिने हिसकावून नेले. जवळपास ४० ग्रॅम वजनाचे दागिने (jewelry) चोरट्याने नेले. पाचकंदील चौकातील एका स्पोर्टच्या दुकानासमोरून भाजी विक्रेती महिला पायदळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून नेली.
आरोपी हा सराफा बाजारातून महिलेच्या मागावर असल्याचे सीसीटीव्हीतून दिसत आहे
त्यानंतर पुढे काही अंतरावर कॉटन मार्केट चौकात मुलीच्या गळ्यातून गोफ हिसकावून नेला. या घटनेनंतर महिला तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात पोहोचल्या. एकाच वेळी दोन घटना झाल्याने पोलिसांनी तातडीने आरोपीचा माग काढणे सुरू केले. पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली आहे. आरोपी हा सराफा बाजारातून महिलेच्या मागावर असल्याचे सीसीटीव्हीतून दिसत आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा शहरात प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. मध्यंतरीच्या दिवसांत सोनसाखळी चोरांचा हैदोस वाढल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र हेच भामटे अधूनमधून डोके वर काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. एकाच रात्री अन त्याही केवळ दहा मिनिटाच्या अंतरात घडलेल्या दोन घटनेमुळे नागरिकांत खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांचा सुगावा लावण्याचे काम सुरू केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






