ग्रामीणमध्ये २०७ जागा अन् २७,९८१ उमेदवार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : ग्रामिण पोलिस दलातील २०७ पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई पदासाठी एकुण २७ हजार ९८१ उमेदवारांचे अर्ज आले असून, १९ जूनपासून त्यांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. ती मैदानी भरती प्रक्रिया जोग स्टेडीयमवर होणार असून दरदिवशी पहाटे पाच वाजतापासून ती सुरू होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी दिली. प्रत्येक उमेदवाराला इमेल पाठविण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस आस्थापनेच्या या भरतीसाठी १९८ पोलिस शिपाई तर ९ जागा या पोलीस शिपाई चालक पदाकरीता आहेत. पोलीस शिपाई पदाकरीता पुरुष उमेदवारांचे १८ हजार ४१९ व महिला उमेदवारांचे ७१३० असे एकुण २५ हजार ५४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच पोलीस शिपाई चालक पदाकरीता पुरुष उमेदवारांचे २,३९१ तर महिला उमेदवारांचे ४१ असे २४३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. १९ जुनपासून सुरू होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी तयारी पुर्ण झाली आहे. १९ जुनला आठशे उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. कागदपत्र परिपूर्ण असलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तत्पूर्वी उंचीचे मोजमाप होणार आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान दरदिवशी एसडीपीओंसह ४०० पोलिस अधिकारी, अंमलदार तैनात असतिल. मैदानात सर्वत्र सीसीटीव्ही असतील. एकुण १९८ जागांपैकी ६० व ९ पैकी एक अशा एकूण ६१ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

 

तर दुसऱ्या, अन्य तारखेचाही पर्याय पावसाळा सुरू होत असल्याने पोलीस भरती प्रक्रीयेदरम्यान संपूर्ण दिवस पाऊस आल्यास किंवा पावसामुळे त्या दिवशी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्यास उमेदवारांना पुढील तारीख देण्यात येईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरीता एकापेक्षा जास्त टिकाणी आणि एकच दिवशी मेदानी चाचणीकरीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल, अशा उमेदवारांना दूसरी तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल.
पोलिस भरतीमध्ये कोणताही व्यक्ती हा उमेदवारास संपर्क साधून पैशाच्या मोबदल्यात भरतीत निवड निश्चित करण्याचे प्रलोभन दाखवित असल्यास उमेदवाराने प्रलोभनास बळी पडू नये. त्याबाबत एसीबी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार करावी.
विशाल आनंद, (पोलिस अधीक्षक अमरावती)
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013616
error: Content is protected !!