करजगावात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

करजगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून येथे विजेचा लपंडाव सुरूच आहे. कधी हवा, तर कधी पावसाचे कारण देत वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे कारण पुढे करीत महावितरण आपला हलगर्जीपणा निसर्गावर ढकलत आहे.
वारा व पाऊस नसतानाही विजेचा खेळखंडोबा सुरूच असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणचे कर्मचारी यांना वीजपुरवठा खंडित होताच संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ते कर्मचारी, अभियंता नॉट रिचेबल येतात. तेव्हा महावितरणचे कर्मचारी अभियंता यांचा भ्रमणध्वनी हाही विजेवर चालतो का? असा गहन प्रश्न ग्राहकांना पडला आहे. उन्हाळयात देखभाल खर्च मिळत असून वृक्ष कटाई केली जाते; तसेच वीज वाहिनीची देखभालीकरिता वीजपुरवठा खंडित केला जातो. मग पावसाळ्यात रोजच तक्रारी का? वृक्ष कटाई उन्हाळ्यातच होत असताना पावसाळ्यात कोणते वृक्ष पडले जातात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे कुठलीही पूर्व सूचना न देताच वीज पुरवठा खंडीत होत असल्याने स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याची दखल महावितरण कडून घेतली गेली नाही.

 

पंचक्रोशीत सुरळीत करजगावात नाहक त्रास पंचक्रोशीतील छोट्या मोठ्या गावात वीज खंडित होण्याचे प्रमाण नसाल्यागत आहेत. करजगाव मोठे गाव असून, विजेचा नियमित तासनतास वीजपुरवठा खंडित होतो आहे. लाखनवाडी सबस्टेशन झाले तेव्हापासून त्रास वाढला. त्या सबस्टेशनची क्षमता तपासून वीजपुरवठा नियमित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांन करीत आहेत.
सबस्टेशनला प्रॉब्लेम होता तो दुरुस्त करण्यात आला आहे. पुन्हा वीजपुरवठा खंडित होणार नाही. मोठी लाइन असल्याने लोड जास्त
आहे. -तुषार गांजरे, (उपविभागीय अभियंता )
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013616
error: Content is protected !!