
अमरावती : मनपा मुख्यालयातील दुसऱ्या माळ्यावरील कॉर्नरला अस्वच्छतेने विळखा घातला आहे. दोन महिन्यांपासून तो कचऱ्याचा ढीग तेथे जैसे थे पडून आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेला तो कचरा उचलण्याचा मुहूर्त मुख्यालयातील स्वच्छता कामगारांना मिळालेला नाही. आरोग्य, स्वच्छता, पशुशल्य, उद्यान, अभिलेखागार व विधी विभागाचे अधिकारी, कर्मचारी रोज ये-जा करतात. आपल्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या, कॉरिडोरच्या कोपऱ्यातील तो अस्ताव्यस्त पसरलेला कचरा सर्वांच्या दृष्टीस पडतो. मात्र, लाकडाचा भुसा, प्लास्टिकच्या बॉटल्स, पुढे, चहाचे वापरलेले कागदी कप प्लास्टिक पन्नी असलेला तो कचरा कित्येक दिवसांपासून उचलला गेला नाही. विशेष म्हणजे, दररोज त्या कचऱ्यात भरच पडतेय. तेथून हाकेच्या अंतरावर आरोग्य व स्वच्छता अशी दोन्ही कार्यालये आहेत. त्यामुळे तो कोपरा स्वच्छ करण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे आरोग्य व स्वच्छता ही एकमेकांनी जोडलेली कार्यालये. त्यांची कार्यक्षेत्रे एकमेकांशी निगडित आहेत. स्वच्छता झाली नाही, की आरोग्य बिघडते.वैद्यकीय आरोग्य अधिकारी व प्रभारी स्वच्छता अधिकारी हे दररोज आपल्या कार्यालयात कचरा साचलेल्या त्या कॉरिडोरच्या कोपऱ्यातील कचरा नजरेत साठवून पुढे जातात. त्यांच्यासह अन्य अधिकारी देखील तेथून येजा करतात. तो कचरा हटविण्याची सुचना मात्र कुणीही कुणालाही केली नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 49






