अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत दोन दिवसांपूर्वी प्र-कुलगुरुंची निवड प्रक्रिया आटोपली आहे. आता कुलसचिव, परीक्षा नियंत्रकांच्या पदभरतीकडे लक्ष लागले असून, कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते हे कुणाची नियुक्ती करतात, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. १४ जून रोजी आयोजित व्यवस्थापन परिषदेत नवीन प्र-कुलगुरु नियुक्तीचा विषय पार पडला नागपूर येथील शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. महेंद्र ढोरे यांची प्र-कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त व लेखा अधिकारी पदाच्या १८ जूनला मुलाखती असून, बदललेल्या विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार या पदावर विराजमान होणारा उमेदवार सनदी लेखापाल (सीए) असावा अशी अट आहे. मात्र, कुलगुरु हे वित्त व लेखा अधिकारी वर्णी लावतात, याकडे नजरा नागपूर येथील शिवाजी लागल्या आहेत. तसेच १८ जून रोजी संचालक नवोपक्रम व नवसंशोधन साहचर्य मंडळाकरिता मुलाखती होत आहेत. या पदासाठी वाणिज्यिक अभ्यासू आणि संशोधकवृत्तीच्या उमेदवाराची निवड करावी लागणार आहे. विद्यमान प्रभारी संचालक डॉ. स्वाती शेरेकार यांनी नियमित नियुक्तीकरिता ‘फिल्डिंग’ लावत असल्याची माहिती आहे.या पदांच्या निवडीत लागणार कस
१९ जून रोजी परीक्षा नियंत्रकाची निवड मुलाखतीच्या माध्यमातून होईल. २० जून रोजी कुलसचिवांची निवड असून, त्या दिवशी नियुक्त्ती केली जाईल. कुलसचिव पदाकरिता अनेक प्राध्यापक व काही अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते यांना कस लागणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 49







