
अमरावती : येथील एका मॉलमधील एजंट जॅक नामक बार सुरळित चालू ठेवण्याच्या मोबदल्यात खंडणी उकळल्याप्रकरणी युवा सेनेचे (ठाकरे गट) राहुल माटोडे व युवक कॉग्रेसचे समीर जवंजाळ यांच्यासह महेश नामक इसमाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी खंडणी उकळण्यासह मारहाण व शिविगाळ केल्याचा गुन्हा नोंदविला. एजंट जॅकचे संचालक अनमोल अरोरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी एफआयआर नोंदविला. गाडगेनगरचे पोलीस निरिक्षक प्रशांत माने यांनी ही माहिती दिली.चालवतात. पुणे येथील पोर्शे अपघात घटनेनंतर अमरावतीमधील कथित बार कम पबचा विषय पैरणीवर आला होता. सर्वपक्षीय आंदोलन देखील झाले होते. मात्र, यापुढे बार अथवा पब सुरळित चालवायचा असेल तर, त्यामोबदल्यात माटोडे यांनी आपल्याला खंडणी मागितल्याचा आरोप अरोरा यांनी केला. १६ जून रोजी एका ठिकाणी बैठक झाली. त्यावेळी माटोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याचे अरोरा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
माटोडे यांच्या धमकीला घाबरत आपण त्यांना ७ जून रोजी खंडणीची रक्कम म्हणून फोन पेद्वारे २५ हजार रुपये दिल्याचे अनमोल अरोरा यांनी तक्रारीत म्हटले आहे. अरोरा हे भागीदारीत एजंट जॅक हा बार चालवतात. पुणे येथील पोर्शे अपघात घटनेनंतर अमरावतीमधील कथित बार कम पबचा विषय पैरणीवर आला होता. सर्वपक्षीय आंदोलन देखील झाले होते. मात्र, यापुढे बार अथवा पब सुरळित चालवायचा असेल तर, त्यामोबदल्यात माटोडे यांनी आपल्याला खंडणी मागितल्याचा आरोप अरोरा यांनी केला. १६ जून रोजी एका ठिकाणी बैठक झाली. त्यावेळी माटोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याचे अरोरा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अरोरा यांच्या तक्रारीवरून माटोडे, जवंजाळसह तिघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. अरोरा यांनी माटोडे यांच्या फोनपेवर २५ हजार रुपये खंडणी पाठविल्याची तक्रारीत नमूद आहे.
– प्रशांत माने, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






