धानोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

 

संजय कारवटकर विदर्भ प्रतिनिधी

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प.उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा धानोरा येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने सेंट्रल सिक्युरिटी फोर्स मध्ये सेवा देणारे माजी सैनिक विठ्ठल सुरकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून धानोरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर यांनी आपला मान सैनिकाला देऊन तिरंगी झेंड्याला एकप्रकारे मानवंदना दिली.

त्यानंतर स्वातंत्र्यदिनाचे महत्व शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पटवून दिले. त्यामध्ये साची मानकर.परी पाटील, सर्वज्ञ शेंडे,अनुष्का गुजरकर, हार्दिका घोडे, श्वेता पवार, हर्षदा देवतळे, ईशिका पोटभरे,स्वतंत्र ढाले,तनश्री कारवटकर, जिविका बावणे, रुचिता ताकसांडे, शौर्य कुडमते, शेजल कुळसंगे, अनुष्का धुर्वे, आर्या उईके, अनिकेत मुन, भूषण मेश्राम, नंदिनी कारवटकर, हिमांशी पन्नासे, दिया घिनमिने, वैष्णवी जांभुळे, मानव चौके या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगातातुन स्वातंत्र्यदनाचे महत्व पटवून दिले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी सदस्य बाबाराव घोडे यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. व तसेच स्वर्गीय डॉ.देविदासजी येनोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षय येनोरकर यांच्या कडून धानोरा जिल्हा परिषद शाळेतील वर्ग चौथीतून जो विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक हजार रुपये पारितोषिक देण्याचे ठरवले आहे. यावेळी यावर्षी चा हा एक हजार एक रुपयाचा पुरस्कार चौथ्या वर्गातून पाचव्या वर्गात गेलेला स्वतंत्र रवींद्र ढाले या विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कारवटकर, उपाध्यक्ष दिक्षाताई मुन, उपसरपंच विशाल येणोरकर,सदस्य मालाताई कुमरे,पालुताताई कापटे, अनिताताई कापटे, अंजनाताई कुळसंगे, अर्चनाताई साखरकर, सोनालीताई वरुडकर,दशरथ बिटे, अविनाश साखरकर, राजू मेश्राम, शंकर कन्नाके,शिक्षण प्रेमी सदस्य बाबाराव घोडे ,संदीप ढेकणे,रमेश कुळसंगे तसेच माजी सैनिक विठ्ठल सुरकार ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजयकुमार लांबट, शिक्षक संदीप टूले, रत्नमाला धुर्वे, रीना चौधरी, प्रणाली रडके,अविनाश ठाकरे व शिक्षक स्वसेवक योगेश घोडे तसेच मदतनीस विजय मेश्राम हे सर्व उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013613
error: Content is protected !!