जिजाऊ ब्रिगेडची निदर्शने…
z24news.dreamhosters.com वृत्तसंकलन
अंजनगाव सुर्जी : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी अंजनगाव सुर्जी येथे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जोरदार निदर्शने केली. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरूणीच्या बलात्कार-हत्येप्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गल्ली ते दिल्ली सर्वच सामाजिक आणि राजकीय संघटना आंदोलन करत आहेत. अंजनगाव सुर्जीत आज जिजाऊ ब्रिगेडतर्फे निदर्शने करण्यात आली.
यावेळी असंख्य महिला निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.आंदोलक महिला हातात फलक घेऊन पीडितेला पाठिंबा देताना दिसत होत्या; तसेच कँडल लाऊन डॉक्टर महिलेला श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके, तालुकाध्यक्षा सारिका मानकर, स्वाती लहाने, स्वाती मानकर, पल्लवी अढाऊ, रजनी कळमेघ, छाया कोकाटे, विजया तुरखडे, कविता काळे, सुषमा कोकाटे, विद्या अरबट, कविता येवले, शीतल बोके, प्रतिभा पाटील, मनीषा सायखेडे, जया येवले, हर्षा चऱ्हाटे, संगीता दाळू, जयश्री देशमुख, सोनल निमकाळे, शुभांगी पांडे, रोशनी थोरात, संगीता तुरखडे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






