
अमरावती : निवडणूक आयोगाने प्रहार जनशक्ती पक्षाला बॅट हे निवडणूक चिन्ह नेमून दिले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता. तो अर्ज निकाली बॅट हे अधिकृत निवडणूक चिन्ह काढत निवडणूक आयोगाकडून प्रहार पक्षाला नेमून देण्यात आले आहे. त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक मैदानात असतील. यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा कप-बशी चिन्हावर निवडणूक लढवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांनी विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, तिसऱ्या आघाडीचीही त्यांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी बंड पुकारलं होतं. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला शिट्टी हे चिन्ह मिळालं होतं.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






