
* पप्पू उर्फ मंगेश पाटील यांचे प्रतिपादन
* पप्पू पाटील मित्रमंडळाचा स्नेहमिलन सोहळा
अमरावती : अमरावतीतल्या नेत्यांचा पक्ष आणि विचार दोन्ही बदलले आहेत. ज्यांना काल मतदान केले ते आज दुसर्यात पक्षात आहेत. नेत्यांना त्यांच्या चुका मतदारांनी लक्षात आणून द्यायला पाहिजे परंतू तसे आपण करत नाही. त्यामुळेच पाच वर्षे शहरात कचर्याच्या ढिगार्यांचे साम्राज्य होते आणि ऐन निवडणूकीच्या काळात मनसेने आंदोलन केल्यावर कचरा उचलला गेला. अमरावती शहराचा विकास हा भरकटला असून त्याला नवी दिशा देण्यासाठी नव्या विचारांची आणि नव्या सहकार्यांची गरज असल्यामुळेच मी माझे पाऊल विधानसभेच्या निवडणूकीत टाकतो आहे असे प्रतिपादन पप्पू उर्फ मंगेश पाटील यांनी केले. पप्पू पाटील मित्रपरिवाराच्या वतीने नवसारी रोडवरील डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख क्रीडा संकुल येथे आयोजित स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख होते. यावेळी कार्यक्रमाला डॉ. राजीव जामठे, प्रकाश साबळे, सिद्धार्थ वानखडे, विजय राऊत, सुरेंद्र गावंडे, डॉ. प्रफुल्ल गवई, विठ्ठलराव भटकर, जयंतराव वानखडे, सूनील भालेराव, विनोद राजूरकर, समित सिगई, धनंजय बंड, दिलीप खत्री, ढाकूलकर, बिजवे, पडोळे, वासुदेवराव जाधव, दाळू आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पप्पू पाटील यांनी बोलताना सांगितले की, ऐन निवडणूकीच्या तोंडावर जनतेची ओरड झाली म्हणून कचरा उचलला जातो. 5 वर्ष जनतेला वारूयावर आणि कंत्राटदार मित्रांना मलाई दिली जाते हे दुकान आता बंद करण्याची वेळी आली आहे. मुस्लिम मत मिळतील आणि आपण विजयी होऊ असा ग्रह काही उमेदवारांचा झाला आहे. अगदी सहज आपला विजय शक्य होईल ही अपेक्षा त्यांना आहे. अमरावती शहराच्या विकासाचा संकल्प आपण सर्व मित्रपरिवाराने करून काम करू. शहराला नवी दिशा देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला अमरावती शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, राजकीय नेते, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दिग्गजांची भरगच्च उपस्थिती होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






