
तपोवन गेट परिसराच्या बैठकीत आ.सौ.सुलभाताई खोडके यांचा स्थानिकांशी संवाद
अमरावती : विधानसभा अंतर्गत आगामी दिशा व वाटचाल ठरविण्याचा निर्धार घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रभागा – प्रभागात बैठकांचा झंझावाती दौरा सुरु केला आहे. याला स्नेहीजन, सहकारी व सर्वसमावेशक जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसाद व साथ लाभत आहे. या अंतर्गत रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी अँनिमेशन कॉलेज येथे तपोवन गेट परिसराची बैठक संपन्न झाली.
शहर म्हटले की नागरिकांना सोयीसुविधा पुरवणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रभागात अखंडित वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.विकासाची नवसंकल्पना राबविण्यासह दर्जेदार विकासकामांच्या माध्यमातून तसेच लोकांच्या समस्या जाणून घेत त्यावर भरीव उपाययोजना करण्यावर आपला भर आहे.जनतेच्या आशा-आकांक्षांना वाव देण्यासाठी व त्यांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांकडून प्राप्त सूचनांचा आदर करीत पर्याप्त निधी उपलब्ध करून जनतेला अपेक्षित असा नियोजनबद्ध परिपूर्ण शहरी भागातील विकासचक्राला गती देण्याचे कार्य आपण जनआशीर्वादाचे बळावर करीत आहोत. असे प्रतिपादन आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले.
याप्रसंगी स्थानिक मान्यवर नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या पुढाकाराने व त्यांनी मूलभूत सुविधांच्या कामांकरिता निधी उपलब्ध करून दिल्यानेच तपोवन परिसराचा कायापालट झाला असल्याचे सांगून आगामी काळात आमची सुलभाताईंनाच साथ राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आमदार महोदयांचे स्वागत, सत्कार तसेच त्यांना निवेदन देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी झाली असता आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या निवेदनांचा स्वीकार करीत याची आगामी काळात लवकरच पूर्तता करणार असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून विकासाच्या संकल्पनेत पायाभूत सुविधांची पूर्तता व सर्वसमावेशक घटकांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विविध योजनांची पूर्तता व शासकीय सुविधांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याने अमरावती मध्ये सद्या आरोग्य, शिक्षण, उद्योग, रस्ते विकास अशा सर्वच बाबतीत विकास साधला गेला असल्याचे मनोगत जेष्ठ मार्गदर्शक संजय खोडके यांनी व्यक्त केले.
या बैठकीला तपोवन गेट, सुरक्षा कॉलनी, अंबिका नगर, केशर कॉलनी, संकेत कॉलनी, कृष्णा नगर, दत्त कृपा कॉलनी , रामानंद रेसिडेन्सी , संत गाडगेबाबा नगर, योगीराज नगर, माधवी विहार , डॉक्टर कॉलनी गौरव नगर व इतर परिसरातील नागरिक तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






