
अमरावती : विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. त्यासाठी पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक असते. हे व्हेरिफिकेशन आता तीन ते आठ दिवसांत करणे आवश्यक आहे. त्यामुळे १५ ते २० दिवसांत पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यासाठी आपण भरलेला फॉर्म योग्य असावा, सर्व कागदपत्रे व्यवस्थितरीत्या दिल्यास ती प्रकिया सोपी होते. त्याच तारखेला पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पाठविली जाते. विलंब करू नये; अन्यथा तुमच्या प्रक्रियेस उशीर होण्याचा प्रकार समोर आलेला आहे.
अमरावती येथील मुख्य डाकघरात पासपोर्ट कार्यालयाला जागा देण्यात आली आहे. येथील पासपोर्ट कार्यालय मुख्य डाकघर अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात चालते. येथून व्हेरिफिकेशन करून संबंधितांचे अर्ज नागपूर पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर नागपूरमधून पासपोर्ट इश्यू केला जातो.मात्र एप्रिलपासून पासपोर्ट ऑनलाइनच्या संकेतस्थळाचे मोडिफिकेशन सुरू असल्याने ऑनलाइन अपॉइंटमेंटला वेग खूपच कमी झाला होता. ते संकेतस्थळ खूपच कासवगतीने सुरू होते. आता ७ ऑगस्टपासून पुन्हा त्याला वेग आल्याने पासपोर्ट व्हेरिफिकेशन व अन्य प्रक्रियेला वेग आला आहे. शहर पोलिस व ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेला पासपोर्टधारकांचे अर्ज व्हेरिफिकेशनसाठी पाठविले जातात.
सात महिन्यांत दिले ३५२० पासपोर्ट येथील मुख्य डाकघरातील पासपोर्ट कार्यालयातून जानेवारी ते २० ऑगस्टपर्यंत ३५२० इतके पासपोर्ट देण्यात आले आहेत. तशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
गुन्हा नसल्यास त्वरेने प्रक्रिया व्यक्तीची ओळख व भारतीयत्वाचा पुरावा महत्त्वाचा असतो. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची खातरजमा केली जाते. ठाण्यात संबंधित व्यक्त्ती प्रत्यक्ष हजर झाल्यानंतर विचारपूस केली जाते. पुढे एसबीमधून ते अर्ज हाताळले जातात. – सतीश पाटील, विशेष शाखा प्रमुख
ऑनलाइनमुळे वेळेची बचत ऑनलाइन प्रक्रिया असल्याने अर्जदारांच्या वेळेची बचत होऊ लागली आहे. पासपोर्टसाठी केलेल्या अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे योग्य असावीत तरच ती पुढे अपलोड केली जातात. काही चुका असल्यास ते डॉक्युमेंट पुढे जात नाही.
– पासपोर्ट सेवा केंद्र अधिकारी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






